अभिमान आहे मला मी भारतातून न्यू इंडियात शिफ्ट झालो आहे !
अभिमान आहे मला माझ्या न्यू इंडियातील सिस्टमचा !
अभिमान आहे मला माझ्या सत्ताधारी आणि विरोधक राज्यकर्त्यांचा !
Welcome into our New India !
जागतिक पटलावर आम्ही नेतृत्व करायला निघालो आहोत पण खरंच आम्ही त्या लायकीचे आहोत का ?
व्यापार व्यवसायात आम्ही स्वत:चं स्थान निर्माण करु इच्छितो ; पण माणुसकीचं काय ?
सिरीया , इराक इराणपेक्षा नंगानाच आज आमच्या सो कॉल्ड न्यू इंडियात होत आहे ! सबंध जगापुढं आज आमचा लोकशाहीचा फ्री कॉस्ट शो सुपरहीट होत आहे.
Welcome into our new India !
जिथे न्यायव्यवस्था राजकीय दावणीला बांधणीलेली आहे. मुक्या जनावराच्या शिकारीला २० वर्षापर्यंत रवंथ चालते , जिथे आमच्या संस्कृतीची लक्तर वासनेच्या हातून पैशाच्या बळावर टांगली जातात ,
Welcome into our New India
जिथे बलात्कार्याला जातीच्या आधारावर राजकीय पोळी भाजण्यासाठी चेला बनवलं जातं ,
जिथे शिवरायांच्या चौरंगा शासनाला धाब्यावर बसवून माय माऊली स्त्रीमातेला भोगवस्तू समजलं जातं ,
जिथे राजकीय वरदहस्ताखालीच आमच्या राष्ट्रपुरुषांचा सर्रास अपमान केला जातो , आणि बेगडी मोठेपणा दाखवला जातो ,
Welcome into our New India
जिथे आमचा रक्षणकर्ता सैनिक दररोज स्वत:च रक्त पाण्यासारखं सांडतो आणि आमची ५६ इंंचाची छाती गर्वाने जग फिरुन येते
जिथे आमचा पालनकर्ता शेतकरी राजा नावापुरता राजा आहे आणि मुलभूत गरजासाठी त्या राजाला आत्महत्या करावी लागते ,
जिथे आमच्या पालनकर्त्याला साला म्हणून हिनवलं जातं तर राजकीय पोळी भाजण्यासाठी कर्जमाफीचं गाजर दाखवलं जातं,
Welcome into our New India
जिथे वैचारिक मानवतेचा खून केला जातो ,
जिथे पैसा उकळण्यासाठी खोट्या केसेस टाकून राज्यघटनेचा अपमान केला जातो ,
जिथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दंगली घडवल्या जातात ,
Welcome into our New India
जिथे आमच्या न्यू इंडियाचं महात्म्य सांगायला शब्द कमी पडतात आणि वाचाळविरांना अवर्णनीय असा चेव येतो ,
जिथे लोकशाहीचे चारही खांब डळमळीत होत आहेत ,
जिथे आमची तरुणाई फेसबुक व्हॉट्सअपवर जागतिक युद्ध करतात ,
आणि राजकीय नाकर्ते स्वत:ची पोळी भाजून पोट भरतात ,
Warm welcome into our New India…..