You are currently viewing रणमर्दानी मराठ्यांच्या धगधगत्या पराक्रमाच्या अग्नीकुंडाची उसळणारी समिधा- काहून !

रणमर्दानी मराठ्यांच्या धगधगत्या पराक्रमाच्या अग्नीकुंडाची उसळणारी समिधा- काहून !

रणमर्दानी मराठ्यांच्या धगधगत्या पराक्रमाच्या अग्नीकुंडाची उसळणारी समिधा- काहून !
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातून सुरु झालेली मराठ्यांच्या अतिव पराक्रमाची गाथा अफगाणिस्तानातील काहून पर्यंत डंका वाजवून सहीसलामत परत येते हा ‘क’ पासून ‘क’ पर्यंतचा ‘कौतुकास्पद’ प्रवास म्हणजे काहून !
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापना करुन महाराष्ट्रातील पराक्रमी मनगटांना एक ध्येय देऊन स्वप्नवत वाटणारी, उभ्या भारतवर्षाला आदर्श वाटावी अशी कर्तृत्वाची महागाथा “स्वराज्य” उभारलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात स्वराज्यासाठी , महाराजांच्या शब्दासाठी जिवाची बाजी लावणारे वीर घरटी उभे राहिले.
इंग्रज राजवटीत नाईलाजाने का होईना या क्षात्रतेज अंगी बाणवणार्या घराण्यांनी “मराठा लाईट इन्फंट्री” गाजवली.
अशाच एका युद्धाचा , मराठ्यांच्या काळी पाचवी , सातवी आणि बॉम्बे इन्फंट्री म्हणजेच मराठा लाईट इन्फंट्रीचा रणझुंजार युद्धाचा लेखाजोखा म्हणजे – काहून !
या लिखाण प्रपंचाला पुस्तक किंवा कादंबरी न म्हणता ‘युद्ध’ च म्हणावे लागेल आणि वाचणारा प्रत्येक वाचक एक योद्धा बनून जातो . क्लार्क, अस्कॉईन , ब्राऊन या इंग्रज अधिकार्यांना देखील सबंध भारतातील इतर सैनिकी तुकड्यांपेक्षा मराठा तुकडीवरच या मोहिमेसाठी भरोसा का होता , हे युद्ध लढल्यानंतर वाचकांना समजून येतं. युद्धाच्या सुरुवातीला आपल्याला “केसरी” हा चित्रपट आठवतो , काहून किल्ल्याचं, तिथल्या वातावणाचं केलेलं वर्णन तर जिवंतपणाची जाणीव करुन देतं, सुभेदार जाधवांचा लढाऊपणा , क्लार्क या इंग्रज अधिकार्याचं आपल्या तुकडीतील सैनिकांवर असणारं प्रेम हे जाती धर्माच्या पल्याड असणारं सैनिकीपण दाखवतं. किल्ल्यावर अन्नधान्याचा तुटवडा पडल्यानंतर जया डिंबळे पाटलाचा गहू कापून आणण्याचा प्रसंग महाराजांच्या गनिमी काव्याच्या पराक्रमाची साक्ष देतो. प्रत्येक शब्दागणिक बज्या आणि म्हाद्या या सैनिकांचा प्रेमळ आणि खोचक संवाद वाचकांना गंभीर प्रसंगातदेखील खिळवून ठेवतो.
सुभेदार मोहिते आणि जया पाटलाची निर्णायक युद्धप्रसंगातील गनिमी उडी प्रतापराव गुर्जरांच्या शत्रूच्या गोटात घुसून सपासप शत्रूला कापण्याच्या प्रसंगाची आठवण करुन देते. परतीच्या वाटेवर सुभेदार मोहित्यांवर झालेला हल्ला त्यांना आलेलं वीरमरण , मुंडकं कापून त्यांच्या देहाची बलुच्यांनी केलेली विटंबना पानिपतातील रणबहाद्दर “दत्ताजी शिंदे” वाचकांच्या पुढे उभा करतो. ‘काहीही झालं तर माझ्या सैनिकांचा जीव वाचला पाहिजे’ ही कॅप्टन ब्राऊनची विचारसरणी खर्या नेतृत्वाची चुणूक दाखवते. शेवटी चार तासांचा राहिलेला प्रवास त्यावेळी जया पाटील आणि म्हाद्यासह इतर सैनिकात झालेला संवाद त्यांच्या जगण्याच्या संघर्षाची कहाणी सांगून जातो.
शेवटी लेखक किंवा या लिखित युद्धाची आघाडी सांभाळणार्या काहूनच्या सफरीचा योद्धा अभिषेक कुंभार यांना अशाच लिखाणासाठी शुभेच्छा !

Leave a Reply