संविधानिक पद नसलेले ‘उपमुख्यमंत्री’पद
भारतीय राज्यघटनेच्या कुठल्याही कलमात ज्याचा उल्लेख नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असणारे पद म्हणजे उपमुख्यमंत्री पद !
महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. या पदाचा इतिहास पाहता, त्यासोबत चिटकलेली काही गृहितकं, सोयीचं पद म्हणून झालेली टीका आणि त्यातून वाद, या सर्वांमुळे उपमुख्यमंत्रिपदाच्या इतिहासात डोकावणं तसं संयुक्तिकच ठरेल.
उपमुख्यमंत्रिपद हे नेहमीच युत्या-आघाड्यांच्या राजकारणासाठी सोयीचं पद राहिलंय. कधी सत्ता जाण्याच्या भीतीपोटी, कधी सत्ता स्थापण्यातली एखादी अडचण दूर करण्यासाठी, काही ठिकाणी सहमतीतून, काही ठिकाणी वेळ मारुन नेण्यासाठी, तर काही ठिकाणी सोयीचं राजकारण म्हणून हे पद वापरण्यात आलं.
महाराष्ट्राच्या सत्तेचा इतिहास असा राहिलाय की, जो नेता उपमुख्यमंत्री बनला तो कधीच मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला नाही.
तर जाणून घेऊ या पदावरील व्यक्तीमत्वांबद्दल
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री
नाशिकराव तिरपुडे – ५ मार्च १९७८-१८जुलै १९७८
सुंदरराव सोळंके
१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
रामराव आदिक
२ फेब्रुवारी १९८३ ते ५ मार्च १९८५
गोपीनाथ मुंडे
१४ मार्च १९९५ ते ११ ऑक्टोबर १९९९
छगन भुजबळ
१८ ऑक्टोबर १९९९ ते २३ डिसेंबर २००३
विजयसिंह मोहिते पाटील
२७ डिसेंबर २००३ ते १९ ऑक्टोबर २००४
आर आर पाटील
१ नोव्हेंबर २००४ ते १ डिसेंबर २००८
छगन भुजबळ
८ डिसेंबर २००८ ते १० नोव्हेंबर २०१०
अजित दादा पवार
१० नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१२
२५ ऑक्टोबर २०१२ ते २६ सप्टेंबर २०१४
२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९
३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२
देवेंद्र फडणवीस
30 जून 2022 पासून पुढे
उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही. सर्वाधिक चार वेळा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.
राज्यशासनाचे उपप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणारे हे पद मुख्यमंत्र्या खालोखाल महत्वपूर्ण आहे.
© वाचकमित्र