Vijay Pawar Profile Picture Vachakmitra
उद्योजक । लेखक
B.E. (EnTC)
वाचन चळवळीला समर्पित आणि वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी व जोपासण्यासाठी काम करणाऱ्या ‘वाचकमित्र’ चे संस्थापक विजय गोपाळराव पवार हे लातूर जिल्ह्यातील सारसा या गावचे भूमिपुत्र ! वडील अल्पभूधारक शेतकरी आणि आई गृहिणी असणार्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या विजय पवारांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पुर्ण करुन सुरुवातीला थोडे दिवस टेक्निकल जॉब केला आणि त्यानंतर कुठलेही पाठबळ नसताना पुण्यासारख्या शहरात स्वतःचा व्यवसाय सुरु करत यशस्वी वाटचाल केली. आजच्या घडीला फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात जवळपास ६००० ग्राहकांना सेवा देत ‘द सर्विस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्यूशन्स’ या नावाने त्यांचा ब्रॅंड उभा आहे.

स्वतःचा व्यवसाय उभा करताना आलेल्या शेकडो अडचणी इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी ‘Udyogmitra Bizverse Inc’ द्वारे शेकडो नव उद्योजक तसेच प्रस्थापित व्यावसायिकांना उद्योग विषयक सेवा देत त्यांचे व्यवसाय उभा करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. विजय पवार यांनी लॉकडाऊन काळापासून वेगवेगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून १२,००० पेक्षा जास्त उद्योजकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले, तसेच सध्या १५२+ नव उद्योजक आणि पारंपरिक उद्योजक यांचे मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून काम पाहतात. 
महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उद्योजकीय मार्गदर्शन व्याख्याने देत नवीन उद्योजकीय पिढी घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
विजय पवारांनी लिहीलेले बाराखडी उद्योजकतेची हे पुस्तक सध्या वाचकांच्या पसंतीस उतरले असून अल्पावधीतच ‘बेस्ट सेलर’ ठरले आहे.
शिक्षण, नोकरी, व्यवसाय, रक्तदान आणि आरोग्य या क्षेत्रात महाराष्ट्राला सक्षम करण्यासाठी अराजकीय धर्तीवर, निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून मागील आठ वर्षांपासून काम करत आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन आणि व्यावसायिक मासिकातून व्यवसाय विषयक लिखाण करत उद्योजकीय चळवळ वाढीस लागण्यासाठी प्रयत्नशील असतात.

विजय पवार यांनी वेगवेगळ्या व्यावसायिक कोर्सेस मधून सर्टिफिकेशन्स मिळवले आहेत.
1) Entrepreneurship Development by European University
2) Coaching and Mentoring by European University
3) Digital Leadership in Business by Skillup
4) Business Analysis Basics by Skillup
5) Google Digital Garage Course by Google
6)Google Primer Business Course 
7) Startup India learning Programme by Upgrad