You are currently viewing जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल म्हणजेचआज जागतिक पुस्तक दिन आणि लेखन हक्क दिन !

जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व काय आहे ? जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो ?

दरवर्षी आपण २३ एप्रिल ह्या तारखेला जागतिक पातळीवर पुस्तक दिन काॅपी राईट दिवस साजरा करत असतो.हयाच तारखेला अनेक प्रसिद्ध साहित्यिक जसे की शेक्सपिअर वगैरे इत्यादी यांचा जन्म अणि मृत्यु देखील झाला होता.२३ एप्रिल ह्याच तारखेला विल्यम शेक्सपियर,मेनयुअल मेजिया वलिजो यांचा जन्म देखील झाला होता.
१९९५ साली हा जागतिक पुस्तक दिन साजरा करायला प्रथमतः सुरूवात करण्यात आली होती.
२३ एप्रिलच का?

विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.

कसा साजरा केला जातो हा दिवस?हा दिवस प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी विनामूल्य पुस्तकांची विक्री केली जाते. काही ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तर, काही ठिकाणी वाचनालयांमध्ये एक दिवस मोफत पुस्तके वाचायला दिली जातात.

@वाचकमित्र

Leave a Reply